आमचा परिचय

मुरुड तालुका सुपारी संघ लि.

मुरुड तालुक्यातील सुपारी बागायतदारांची व सुमारे १३६१ सभासद असलेली ही संस्था आहे. सदर संस्थेची मुळ स्थापना १९ सप्टेंबर १९३८ रोजी झालेली आहे. या संस्थेच्या स्थापनेपूर्वी सुपारीचे व्यापारी हे सुपारीला भाव देऊन सुपारीचे वजन कमी दाखवून सुपारी बागायतदारांची फसवणूक करीत असत. या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी त्यावेळी कै. रामचंद्र बाळू कोर्लेकर, कै. रामचंद्र महादेव गुरव, कै. गजानन सहदेव कारभारी तसेच कै. भिकाजी अनंत चौलकर यांनी सुपारी बागायतदारांना एकत्र केले.

अधिक पहा

संस्थापक

कै. रामचंद्र बाळू कोर्लेकर

कै. रामचंद्र महादेव गुरव

कै. गजानन सहदेव कारभारी

HP गॅस लि.

मुरुड तालुक्यातील सुपारी धारकांसाठी आणि इतर नागरिकांसाठी HP GAS ची सुविधा सुपारी संघ तर्फे १९८९ साला पासून करण्यात आली. .....अधिक पहा

आमचे अध्यक्ष

सुपारी बागायतदारांची 'मुरुड तालुका सुपारी संघ' हि महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव संस्था असून तिला ८० वर्षांची समृद्ध इतिहास आहे. संस्थेच्या माध्यमातून बागायतदारांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी विद्यमान संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. सुपारी या फळाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. व्यापार बरोबरच सामाजिक विकासासाठी निरनिराळे कार्यक्रम वर्षभरात आखले जातात यासाठी संचालक मंडळ, कर्मचारी आणि नागरिक यांची मोलाची साथ मिळते

श्री. महेश भगत

(अध्यक्ष )

मेनू