HP - सुधा गॅस एजन्सी
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाढत्या शहरी आणि नागरीकरणामुळे मानवांनी केलेली वैज्ञानिक प्रगती हि उल्लेखनीय आहे. अन्न , वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा लक्षात घेता, मानवी शैली हि ह्याच मुख्य घटकांवर अवलंबून आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये उपजिवीकेसाठीचा ओढा हा शहरांकडे असला तरी मोठया प्रमाणावर आजही गावांमध्ये मानवी वस्ती आढळते. त्यांचा मुख्यत्वे करून अन्न आणि ते शिजवण्यासाठी इंधनासाठीचा प्रश्न हा फारसा जटिल नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर होणारे नागरीकरण लक्षात घेता, त्यास पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सुपारी संघ यांनी मुरुड येथे अन्न शिजवण्यासाठीचा गॅस वितरण करण्याची मुहूर्त मेढ ८० च्या दशकात रोवली.
संघाने हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. कडे गॅस एजन्सीकरिता प्रयत्न केले. त्या प्रयत्नास यश येऊन दिनांक १९.०३. १९८९ रोजी सुधा गॅस वितरण व्यवस्थेचे उदघाटन राज्यसभेच्या तत्कालीन सदस्या आणि मुरुडच्या माहेरवाशिण सौ. सुधा जोशी यांचे हस्ते पार पडले. या उदघाटनांच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. रवींद्रनाथ राऊत साहेब माजी राज्यमंत्री हे होते. उद्घाटनाकरीता हिंदुस्थान पेट्रोलियमचे मार्केटिंग डायरेक्टर श्री. परांजपे साहेब, मार्केटिंग मॅनेजर श्री. कर साहेब, चीफ रिजनल मॅनेजर श्री. रामनाथ साहेब व सेल्स मॅनेजर श्री. सोमेशचंद्रा साहेब व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. गॅस व्यवस्थापनात चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करून संघाने नवीन व्यवसायाकडे वाटचाल केली.
गॅस मुळे मुरुड तालुक्यातील जनतेच्या इंधनाची गैरसोय दूर होऊन नागरिकांना होणार बराचसा त्रास वाचला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम लि. ने संघाकडे करार करताना नगरपालिका हद्दीपुरता केला होता. त्यामुळे संपूर्ण मुरुड तालुक्यात सेवा देण्यासाठी कंपनीकडे प्रयत्न करून कार्यक्षेत्र वाढवून घेतले आहे.
आजमितीला संघाकडे एकूण ११४७० चालू कनेक्शन असून त्यात सातत्याने वाढ होत आहे, हे संघासाठी भूषणास्पद आहे.