मुरुड तालुक्यातील सुपारी बागायतदार

मुरुड तालुक्यातील सुपारी बागायतदारांची व सुमारे १३६१ सभासद असलेली ही संस्था आहे. सदर संस्थेची मुळ स्थापना १९ सप्टेंबर १९३८ रोजी झालेली आहे. या संस्थेच्या स्थापनेपूर्वी सुपारीचे व्यापारी हे सुपारीला भाव देऊन सुपारीचे वजन कमी दाखवून सुपारी बागायतदारांची फसवणूक करीत असत. या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी त्यावेळी कै. रामचंद्र बाळू कोर्लेकर, कै. रामचंद्र महादेव गुरव, कै. गजानन सहदेव कारभारी तसेच कै. भिकाजी अनंत चौलकर यांनी सुपारी बागायतदारांना एकत्र केले.

सुरवातीस २२ सभासदांनी सुपारी मुरुड येथ न विकता ती फोडून मुंबई बाजारात विकण्याचे ठरविले. त्यावेळी वाहतुकीची सोय नव्हती. जहाजामार्फत हा माल जायचा. त्यावेळी या मंडळींनी प्रसंगी डोक्यावर गोणी घेऊन वाहतूक केली. नफा तोटा काहीही होवो सर्वानी तो प्रमाणात वाटून घ्यायचा. हे तत्व त्यांनी पत्करले. त्यावेळच्या संस्थान सरकारच्या कायद्यानुसार संघाची सरकारी संस्था म्हणून नोंद केली गेली. या कमी द. श. पेंडसे, ज. आ. भगत, शां. ल. ठाकूर यांची मदत संस्थेला झाली.

अनेक संकटाना तोंड देत सदर संस्थेने ७९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सुरुवातीच्या काळात एक इमारत असणाऱ्या संस्थेकडे चार इमारत झाल्या आहेत. सुपारी व्यतिरिक्त गॅस एजन्सी, खत विक्री, कीटकनाशक विक्री अशा प्रकारची विक्री करून जास्त नफा न घेता संस्था विक्री करीत आहे

सुपारीला मिळणारा दर हा दरवर्षी फायद्यात आहे. संस्थेला सन २०१६-१७ ऑडिट वर्ग 'ब' मिळालेली आहे. संस्थेने लोकांच्या हिताच्या दृटीने वेगवेगळे उपक्रम राबविली आहेत. त्यामध्ये मोफत मोटीबुंदू शास्त्रकिया शिबीर, कृषी मेळावा इत्यादींचा समावेश आहे.

आज या संस्थेत १५ कायम सेवकवर्ग काम करीत असून ७० ते ८० रोजदारीवर काम करीत आहेत. दि. ०६. ०६. २०१५ रोजी नूतन कार्यकारिणी मंडळाने संघाचा कारभार ताब्यात घेतला असून चेअरमन म्हणून श्री. महेश हरिश्चंद्र भगत यांची निवड झाली आहे. नवीन कार्यकारिणीने दलालांच्यात स्पर्धा निर्माण करून जास्तीत जास्त सुपारीला भाव मिळून सभासदांचा जास्तीत जास्त फायदा होईल याकडे लक्ष घातले आहे

सुपारी संघातून प्रतवारीने बारा प्रकार सुपारीचे काढले जातात त्यामध्ये मोहरा-१, मोहरा-२, मोती, वच्छरास, झिणी, फटोर-१, फटोर-२, फटोर-३, फुट-१, फुट-२, खोका-१, खोका-२ यांचा समावेश होतो सदर संस्थेत मुरुड तालुक्यातील १३६१ सभासद असून त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन इत्यादी वेगवेगळ्या धर्माचे-जातींचे लोक एकत्र आल्याने हि संस्था म्हणजे सर्वधर्म समभाव याचे प्रतीक बनले आहे.

मेनू